इस्लामाबाद – भारताने आपल्या मिशन शक्ती उपक्रमात अंतराळतील उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची जी चाचणी घेतली त्यामुळे तेथे निर्माण झालेल्या अंतरीक्ष कचऱ्यामुळे काल नासाने चिंता व्यक्त केल्याच्या पाठोपाठ आता पाकिस्ताननेही चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने त्यासंबंधात आज एक निवेदन जारी केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की नासाने भारताच्या एसॅट बाबत जी चिंता व्यक्त केली आहे ती गंभीर आहे. भारताच्या या कृतीने अंतराळातील अनेक शांततापुर्ण उपक्रमांनाहीं धोका निर्माण झाला आहे.
पृथ्वीच्या कक्षेच्या भोवती आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनही कार्यरत आहे. त्यात अंतराळवीर वास्तव्याला असतात या कचऱ्यामुळे त्यांच्या प्रयोगांवरही मर्यादा आल्या आहेत त्याचे गंभीर परिणाम भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे असे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.