इस्लामाबाद – आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने मानधन न घेण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. काटकसरीच्या उपाययोजनांसाठी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये अनावश्यक खर्चाला आळा घालण्याच्या धोरणाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाक पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
नवीन अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी देखील गेल्याच आठवड्यात सरकारी पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री अति श्रीमंत श्रेणीत गणले जातात. त्यामुळे त्यापैकी कोणीही सरकारी पगारावर अवलंबून नाहीत. सरकारी खर्चाने मंत्री आणि अधिकार् यांच्या विदेश दौर् याला यापूर्वीच आळा घालण्यात आला आहे.
तसे आदेश राष्ट्रीय तसेच प्रांतीय मंत्र्यांनाही देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून नवीन कर्ज मागायला लागणार आहे.