राजगुरूनगर,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरूनगर, स्व. नानासाहेब गोरडे वाचनालय यांच्या वतीने पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले.
साहित्यिक दि. बा. पाटील, पत्रकार विजय चोरमारे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, म. सा. प. राजगुरूनगर अध्यक्ष संतोष गाढवे, नारायण सुर्वे कला अकादमी अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नानासाहेब गोरडे वाचनालय अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
विविध पुरस्कार व पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे; डॉ. बाबा आमटे समाजसेवा पुरस्कार : डॉ. अभिजित सोनवणे ,पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार : कविता संग्रह इस्टक – अनिल कांबळे, कासरा- ऐश्वर्य पाटेकर, ब्लांटेटीया- बाळासाहेब लबडे, काळजाचा नितळ तळ- भीमराव धुळुबुळु, शिल्लक भीतीच्या गर्भ कोषातून – स्नेहा कदम , विशेष पुरस्कार : शेणाला गेल्या पोरी -चंद्रशेखर कांबळे , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती कादंबरी पुरस्कार : दयन – युवराज पवार, नैमिषरण्यात अर्ध्या रात्री – मुरलीधर सुतार , कै.शंकर पाटील स्मृती कथा संग्रह पुरस्कार :उसवन-लक्ष्मण दिवटे ,प्रा चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार ललित रंग पुरस्कार : विद्या पेठे, स्व. यशवंतराव चंद्रचूड सामाजिक न्याय पुरस्कार : अॅड. अरुण मुळूक, ज्योती सावित्री शिक्षण सेवक पुरस्कार : सुनील घुमटकर, तृष्णा घुमटकर, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार :रोहिणी दौंडकर, सहकार रत्न पुरस्कार सचिन खेडकर.