बारामतीत तटस्थ राहण्याचे शिवसेना कार्यकर्त्यांनी दिले संकेत
बारामती- युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अधिकृत घोषणा न केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. त्यातच भाजपमध्ये गोपीनाथ पडळकर डेरेदाखल झाले आहेत. बारामतीच्या रिंगणात त्यांना उतरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले, त्यामुळे साहजिकच शिवसेनेच्या गोटात अस्वस्था पसली असून त्यांनी थेट तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केल्याने आता हे “त्रांगडे’ भाजप-शिवसेना कसे सोडवणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने बारामतीत धनगर समाजाचा उमेदवार देऊन ऐन निवडणुकीत धनगर समाजाचा आरक्षणाचा ऐल्गार शांत करण्यासाठीच “जातीय कार्ड’ बाहेर कढल्याचे बोलले जात आहे.
मूळचे आटपाडीचे असणाऱ्या गोपीचंद पडळकरांची उमेदवारी अनपेक्षित मानली जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट बारामतीतूनच रिंगणात उतरविले जाईल हे अनेकांना वाटलेच नव्हते. धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने बारामतीतून पडळकरांना रिंगणात उतरवून अजित पवार यांना शह देण्याचा भाजपचा या मागचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पडळकर धनगर आरक्षणाच्या आंदोलनानिमित्त अनेकदा बारामतीत येऊन गेलेले आहेत. उत्तम वक्ते म्हणून त्यांची ख्याती असून भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर थेट बारामती मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. त्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी पडकळारांच्या नावाला “फुली’ मारली असून तेच जर उमेदवार निश्चित झाले तर तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपची चांगलीच अडचण होणार असल्याचे बोलले जात आहे.
- बारामती विधानसभा मतदारसंघातची उमेदवारी गोपीनाथ पडळकरांना दिल्याचे अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. भाजपने स्थानिकांना संधी द्यावी, आयात उमेदवार असेल तर शिवसेना या निवडणूकीत निश्चितपणे युतीधर्म पाळणार नाही.
ऍड. राजेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, पुणे - पक्षाने दिलेला आदेश सर्वांनाच मान्य असून आम्ही आजपासूनच गोपीचंद पडळकरांचे काम करण्यास सुरवात केलेली आहे. त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता मनापासून काम करेल.
– बाळासाहेब गावडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप
गोपीचंद पडळकर हे लवकरच बारामतीत दाखल होतील, आम्ही त्यांच्यासमवेत प्रचाराचे नियोजन करणार आहोत. राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येणार हे निश्चित आहे आणि बारामतीतही सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर आम्ही जनादेश मागू.
– दिलीप खैरे, संचालक, महानंद, - देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी बारामतीत गोपीचंद पडळकर यांचे काम आम्ही नेटाने करु. पक्षाने दिलेला उमेदवार आम्हाला मान्य आहे व आम्ही पक्षसंघटनेसाठी काम करु. पडळकरांच्या माध्यमातून भाजपने अजित पवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे
– अविनाश मोटे, जिल्हा सरचिटणीस, भाजप. - मुख्यमंत्री म्हणाले की…
गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. या वाघाला आपण बारामतीमधून रिंगणात उतरवू. तुमची तयारी आहे? असे असेल तर, मी पक्षाशी बोलतो आणि त्यांना आपण बारामतीमधून निवडून आणू. आपण बारामती जिंकून दाखवू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडकळर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर सांगितले.