बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संगमनेर: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते हे आमदार थोरात यांच्या “सुदर्शन’ निवासस्थानी एकत्र आले. आणि 10 वाजता प्रांताधिकारी कार्यालय, नवीन नगर रोड येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

थोरात यांच्यावर कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी असून त्यांना राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस आघाडीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.