मुंबई – सत्तेच्या नशेत भाजपचे नेते अनेकदा बेलगाम झाल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. नोएडा परिसरातील गौतमबुद्धनगर येथील ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये एका भाजप नेत्याने महिलेला शिवीगाळ केली असून या घटनेचा व्हिडिओ सोशलवर मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Longer version of the video where BJP leader Shrikant Tyagi is seen abusing a woman.
Warning : **Abusive language** pic.twitter.com/1ahGdEjIUq— Mohammed Zubair (@zoo_bear) August 5, 2022
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेसोबत अश्लील कृत्य करणारा भाजप नेता आता फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ही घटना नोएडाच्या सेक्टर-98 बी येथील ग्रँड ओमॅक्स सोसायटीची आहे. श्रीकांत त्यागी असे आरोपी नेत्याचे नाव आहे. तोही त्याच सोसायटीत राहतो. त्याचा एक व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भाजपचा एक नेता एका महिलेशी वाद घालताना दिसत आहे.
या घटनेनंतर या प्रकरणी फतेहपूर सिक्रीचे खासदार आणि भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यागी भाजपा नेते नसल्याचा पक्षाचे स्पष्टीकरण दिले आहे.
मात्र, त्यागी यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या प्रोफाइलमध्ये भाजपच्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि सत्ताधारी पक्षाच्या युवा किसान समितीचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून केले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने भाजपची खरडपट्टी काढली. उत्तर प्रदेशात सत्तेचे रक्षण करणारे भाजपचे गुंड बहिणी-मुलींचा अपमान करत आहेत, असे सपाने म्हटले आहे.