गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे सेलिब्रिटी कपल त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. मात्र अभिनेत्री गौहर खानने वयाच्या अंतराचा झैद बरोबरच्या आपल्या नात्यावर कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
छोटा पडदा गाजवणारी गौहर खान बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती असून, झैद कोरिओग्राफर आहे. तर झैद गायक, संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. दोघेही सोशल मीडियावर आपल्या नात्यासंबधी चाहत्यांना माहिती देत असतात. चाहतेही या सुंदर जोडीच्या नवनवीन पोस्टसच्या प्रतीक्षेत असतात.
अनेकांनी त्यांच्या वयातील अंतराकडे बोट दाखवत कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचे म्हटले आहे. यावर गौहरने आपल्या आणि झैदच्या वयात इतके अंतर नसल्याचा खुलासा केला आहे. गौहर खान म्हणाली, आमच्या दोघांच्या वयातील अंतराचा जो आकडा बाहेर सांगितला जात आहे, तो चुकीचा आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण 12 वर्षांनी नाही; मात्र वयाच्या मानाने तो खूपच प्रगल्भ आहे. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत असल्याचे तिने सांगितले.