Oscars 2024 | Naatu Naatu Song – ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो.
भारतासाठी मागील वर्षीचा ऑस्कर सोहळा खूप खास ठरला होता. याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला. सगळीकडेच या सिनेमाची आणि गाण्याची तुफान चर्चा झाली होती. । Oscars 2024 | Naatu Naatu Song
दरम्यान, मागील वर्षी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आरआरआर चित्रपटाला स्पेशल ट्रिब्युट देण्यात आले. त्यानिमित्ताने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचा पुन्हा एकदा कॅमिओ दाखविण्यात झाला. ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट साँगच्या प्रेझेंटेशन दरम्यान आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याची झलक दाखवण्यात आली.
Dominating the #Oscars2024 floor with his Sherr Screen Pressence 🦁🔥@AlwaysRamCharan ‘s #NaatuNaatu at Academy awards ❤️#GlobalStarRamCharan #RRRMovie #lokeshwar500 pic.twitter.com/frx6FbYv0T
— Lokeshwar Chowdary (@LOKESHWAR500) March 11, 2024
96 व्या ऑस्करसाठी जगभरातील काही उत्कृष्ट स्टंट दृश्यांचा समावेश असलेली क्लिप तयार करण्यात आली होती. या क्लिपमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका असलेल्या पीरियड अॅक्शन फिल्म आरआरआरच्या गाण्याची झलक दाखवण्यात आली. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. । Oscars 2024 | Naatu Naatu Song