Note in Phone Cover : अनेकांना मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये नोटा,कार्ड किंवा काही चिट्ठ्या ठेवायची सवय असते. मात्र या सवयीमुळे अनेकांना संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. फोनच्या बँककव्हरमध्ये काहीही ठेवणे धोकायदायक आहे.
आजकाल मोबाईल फोनमुळे आग लागणे किंवा स्फोट होणे हे नॉर्मल झाले आहे, परंतु यामागचे कारण आपला निष्काळजीपणा देखील असू शकते. अनेकदा फोन जास्त गरम झाल्यामुळे आग लागते. फोनचा अतिवापर किंवा चुकीच्या चार्जिंगमुळेही आग लागते. सामान्यत: फोनच्या प्रोसेसरवर किंवा बॅटरीवर जास्त दाब आल्यावर त्याला आग लागते. याशिवाय, चुकीच्या प्रकारच्या फोन कव्हरमुळे आग लागण्याचा धोकाही असतो, कारण त्यामुळे फोनवर जास्त दबाव येतो. | Note in Phone Cover
फोन कव्हरमुळे तापमान वाढते
अनेक तज्ञ कव्हरशिवाय फोन वापरण्याची शिफारस करतात. यामागचे मुख्य कारण फोन जास्त गरम होणे असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर फोनच्या कव्हरचा प्रोसेसरवरही परिणाम होऊ शकतो आणि तो जास्त गरम होऊ शकतो. फोनच्या कव्हरवर ज्वलनशील वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा प्रोसेसर जास्त गरम झाल्यास आग लागू शकते. ही पद्धत इतकी धोकादायक आहे की उच्च तापमानामुळे फोनचा स्फोट देखील होऊ शकतो. | Note in Phone Cover
फोन कव्हर फोनमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला बाहेर पडू देत नाही, ज्यामुळे फोन जास्त गरम होतो आणि त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. अशात तुम्ही कव्हरमध्ये एखादी पैशांची नोट ठेवलेली असेल तर आग लागण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत फोनच्या कव्हरवर काहीही न ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फोनवर कोणत्याही प्रकारचे घट्ट कव्हर ठेवू नका. | Note in Phone Cover