Bishan Singh Bedi Passed Away: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशनसिंग बेदी 77 वर्षांचे होते. गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशन सिंह यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला होता.
बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये कसोटी सामन्यांमधून क्रिकेटविश्वात पदार्पण केले आणि ते पुढील 13 वर्षांसाठी टीम इंडियासाठी सर्वात मोठे सामना विजेते ठरले. 1979 मध्ये निवृत्तीपूर्वी, बिशन सिंग बेदी यांनी 67 कसोटी सामने खेळले आणि 266 बळी घेतले. या काळात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे ते गोलंदाज होते.
गोलंदाजीशिवाय बिशनसिंग बेदी यांच्याकडे नेतृत्व क्षमताही होती. बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून, बिशनसिंग बेदी यांनी 1976 मध्ये कसोटी मालिकेत त्या काळातील सर्वात बलाढ्य संघ वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.