भोर – भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार (दि.३) ते मंगळवार( दि.९) श्री स्वामी समर्थ अखंड नामजप सोहळा (७ दिवस सप्ताह) वेळ पहाटे ६ ते सायं ६ पर्यंत ॐ श्री स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट, संजयनगर भोर यांच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ भव्य प्रकटदिन सोहळा आयोजन करण्यात आले.
बुधवार( दि.३)सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सहस्त्र स्वाहाकार (होमहवन) गुरुवार, (दि.४) सकाळी ८ वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे सामुदायिक पारायण दुपारी ४.३० वाजता भजनसेवा श्री वाघजाई भजनी मंडळ, भोर, शुक्रवार (दि.५)सायं. ५ वाजता श्री सुक्त पठण- राजा रघुनाथराव विद्यालय, भोर,शनिवार (दि.६) सायं. ५ वाजता श्री सुक्त पठण श्री रेणूका श्री सुक्त मंडळ,
भोर,रविवार( दि.७) सायं. ७ वाजता श्री स्वामी समर्थ तारकमंत्र सामुदायिक पठण,सोमवार (दि.८) सायं. ७ वाजता श्री शिवमहारुद्र महापुजा व भस्म आरती,मंगळवार (दि.९)सायं. ७ वाजता भजन ह.भ.प. श्रुतिका बोरुडे स्वरांजली ग्रुप मॉडेल कॉलनी पुणे, बुधवारी (दि.१०)पहाटे ५.३० वाज -काकडा आरती (श्री स्वामी मुर्तीस) सकाळी ७ वाजता श्रींच्या मुर्तीस महारुद्र दुग्ध अभिषेक,
सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सहस्त्र स्वाहाकार (होमहवन) श्रींच्या पादुकास चंदन लेपन,सकाळी ९ वाजता श्रींच्या निर्गुण पादुकास महाअभिषेक, वस्त्रअलंकार व अत्तर गंधलेपन शिवलींगास सहस्त्रधारा दुग्ध अभिषेक श्री शंकर महाराज मुर्तीस महाअभिषेक व वस्त्रअलंकार अर्पण श्री महालक्ष्मी व तुळजाभवानीमाता महाअभिषेक व वस्त्रअलंकार महापुजा श्री महागणपती मुर्तीस महाअभिषेक व वस्त्रअलंकार श्री स्वामी समर्थ पादुकास महाअभिषेक व अत्तर लेपन,
सायं ५.३० ते ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ भव्य पालखी सोहळा (मंदिर प्रदक्षिणा),सायं ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाआरती,भजनसेवा – सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत श्री वाघजाई भजनी मंडळ, भोर तसेच सायं ७ पासून – भव्य महाप्रसाद रात्री १० वाजेपर्यंत – श्री स्वामी समर्थ शेजारती आयोजन करण्यात आल्याचे ॐ श्री स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट वतीने सांगण्यात आले.