नगर -नगर शहरात शिवसेनेचे चांगले काम आहे, त्यामुळे नगरमध्ये शिवसेनेशी अनेकजण जोडले गेले आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत नगर शहर शिवसेनेची जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी होईल. युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्यांने सोडविण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्व.अनिल राठोड यांचे नगर शहरासह जिल्ह्यात पक्ष वाढीत मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रेरणेने हे कार्य यापुढेही असेच सुरु राहील, असे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी म्हटले.
शहर शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे, गणेश कवडे, शाम नळकांडे, मदन आढाव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, दीपक खैरे, संघटक स्मिता अष्टेकर, महिला शहरप्रमुख अरुणा गोयल आदी उपस्थित होते.
विक्रम राठोड म्हणाले, शिवसेना पक्ष हा राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर भर देणारा पक्ष आहे. लोकांचे अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्पर आहे. त्यामुळे शिवसेनेकडे युवकांबरोबरच सर्वसामान्यांचा ओढा वाढतच आहे. सभासद नोंदणीनिमित्त नगरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. या सभासद नोंदणीमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी महत्वपूर्ण भुमिका बजावतील, असे सांगितले. अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन आंबादास शिंदे यांनी केले. तर आभार मदन आढाव यांनी मानले. यावेळी श्रीकांत चेमटे, सुरेश तिवारी, दत्ता जाधव, राजेंद्र भगत, अशोक दहिफळे, मुन्ना भिंगारदिवे उपस्थित होते.