नगर – जागतिक पोलिओ दिनानिमित्त नगरच्या रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष ऍड. अमित बोरकर यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन जनजागृती अभियानाची सुरुवात एतेहासिक भुईकोट किल्ल्या पासून माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला.
यावेळी सचिव पुरषोत्तम जाधव, माजी अध्यक्ष निलेश वैकर, महावीर मेहेर, दिलीप कर्नावट, हर्षवर्धन सोनावणे, विनायक ससे, नेहा जाधव आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी आपापल्या वाहनांवर जनजागृतीचे बॅनर लावून अभियान राबवले.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले, पोलिओ मुळे जगता करोडो लोकांना अपंगत्व आलेले आहे. अनेक वर्षांपासून पोलिओचे लसीकरण होत आहे. मात्र, अद्यापही पोलिओ पूर्णपणे गेलेला नाहीये. रोटरी क्लब संपूर्ण जगता पोलिओ निर्मुलासाठी जनजागृतीचे करत औषधांचा पुरवठा करत आहे. अजून 2-3 वर्ष पोलिओची लस घेणे गरजेचे आहे. नगर शहरातही रोटरी क्लब पोलिओ निर्मुलनासाठी दरवर्षी जनजागृती करत आहे.
प्रास्ताविकात पुरषोत्तम जाधव यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कामांची माहिती दिली. पोलिओच्या निर्मुलनासाठी रोटरी क्लबचे सुरवाती पासून प्रयत्न आहेत, असे सांगितले.