IPL 2024 : लीग स्टेजनंतर ‘हे’ खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाहेर, विराट कोहलीचा दबदबा कायम…

IPL 2024 (Orange Cap Race) : आयपीएलमध्ये संघासह खेळाडूंमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी रोमांचक लढत पहायला मिळते. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील लीग स्टेजनंतर ही शर्यत अधिक रोमांचक झाली आहे. दोन स्टार खेळाडू या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. वास्तविक, या दोन खेळाडूंचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाहीत. अशा स्थितीत हे दोन्ही खेळाडू आता या मोसमात खेळताना दिसणार नाहीत. दुसरीकडे विराट कोहलीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे.
हे खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून पडले बाहेर…
साखळी फेरीनंतर रुतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. साखळी फेरीनंतर 14 सामन्यांत 583 धावा करून ऑरेंज कॅपच्या यादीत रुतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र त्याचा संघ हंगामाबाहेर आहे. अशा स्थितीत तो पुढे खेळणार नाही. दुसरीकडे, गुजरात टायटन्सही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेली नाही. अशा परिस्थितीत या हंगामात साई सुदर्शनचा प्रवासही संपला आहे. त्याने 12 सामन्यात 527 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप यादीत तो 5 व्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीचा दबदबा कायम …
विराट कोहलीने 14 सामन्यात 64.36 च्या सरासरीने 708 धावा केल्या असून ऑरेंज कॅप यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. या कालावधीत त्याने 5 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. तो या मोसमात 155.60 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. विराटशिवाय ट्रॅव्हिस हेड आणि रियन पराग सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. ट्रॅव्हिस हेड 12 सामन्यात 533 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी रियान परागने 14 सामन्यात 531 धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.
A total of 7️⃣0️⃣8️⃣ runs & Virat Kohli’s dominance continues as the leading run-scorer of #TATAIPL 2024 💯
How many more runs can he add as he gears up for the Playoffs?@imVkohli pic.twitter.com/zL4sI8bih0
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली : (14 सामने – 708 धावा)
रुतुराज गायकवाड : (14 सामने – 583 धावा)
ट्रॅव्हिस हेड : (12 सामने – 533 धावा)
रियान पराग : (14 सामने – 531 धावा)
साई सुदर्शन : (12 सामने – 527 धावा)
आयपीएल 2024 प्लेऑफ वेळापत्रक :
क्वालिफायर-1 : कोलकाता विरुद्ध हैदराबाद, 21 मे, अहमदाबाद.
एलिमिनेटर : राजस्थान विरुद्ध आरसीबी 22 मे ,अहमदाबाद
क्वालिफायर 2 : क्वालिफायर 1 पराभूत विरूध्द एलिमिनेटर विजेता 24 मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर-1 विजेता विरूध्द क्वालिफायर-2 विजेता 26 मे,
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.
दरम्यान, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. केकेआर, एसआरएच, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आयपीएल 2024 ची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.





