पिंपरी – महापालिका सर्वसाधारण सभेत एखाद्या विषयावर बोलू न देणे हा प्रकार म्हणजे हुकूमशाही पद्धतीने सर्वसाधारण सभा चालविण्यासारखा आहे. रिमोट कंट्रोलवर काही कामे केली जात आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
खासगी वाटाघाटीने भूसंपादन करताना तीनशे चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडाचे विभाजन करून तुकडा 300 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचा भूखंड केलेल्या सर्व प्रकरणात सांत्वना रक्कम 30 टक्के इतकीच देय राहील, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आज मंजुरीसाठी होता. मात्र, या विषयावर सदस्यांना बोलू न देता विषय तहकूब करण्यात आला. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना काटे बोलत होते.