माद्रिद – भारतासारख्या देशात नव्हे तर युरोपमध्ये सुद्धा अनेक महिला कोणत्याही प्रकारची नोकरी न करता गृहिणीपद सांभाळण्याचे काम गांभीर्याने करत असतात पण अनेक वेळा जर पतीने किंवा इतर नातेवाईकानी या कामाची गंभीर दखल घेतली नाही. तर न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागते याचे उत्तम उदाहरण आत्ता समोर आले असून, स्पेनमधील एका न्यायालयाने 25 वर्षे गृहिणी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला या कामाबद्दल तब्बल एक कोटी 79 लाख रुपये वेतन द्यावे असा आदेश पतीला दिला आहे.
स्पेनमधील हे दांपत्य 25 वर्ष एकत्र रहात होते गेल्या काही कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने घटस्फोट घेतला जेव्हा घटस्फोटानंतर पोटगी देण्याचा आणि आर्थिक भरपाई देण्याचा विषय समोर आला तेव्हा पतीने मी घरात एकटाच कमवत होतो पत्नी काहीही कमवत नव्हती त्यामुळे मी पोटगी देणार नाही. अशा प्रकारची भूमिका घेतली पती पत्नीमध्ये जेव्हा संपत्तीच्या विभाजनाचा विषय आला तेव्हा सुद्धा पतीने मी माझ्या आर्थिक कमाईतून ही सगळी संपत्ती कमावली आहे. त्यामुळे त्या संपत्तीवर पत्नीचा कोणताही अधिकार नाही अशी भूमिका घेतली होती.
पतीच्या या भूमिकेनंतर न्यायालयाने पत्नीने 25 वर्ष गृहिणी म्हणून जी जबाबदारी सांभाळी त्यासाठी पतीने पत्नीला वेतन द्यावे असा आदेश दिला यासाठी न्यायालयाने स्पेनमधील जो किमान वेतनाचा दर आहे. तो लक्षात घेऊन या महिलेचे गेल्या 25 वर्षाचे वेतन किती होऊ शकते तो आकडा काढला आणि तेवढी रक्कम पतीने पत्नीला भरपाई म्हणून द्यावी असा आदेश दिला पत्नीने दिलेल्या माहितीप्रमाणे पतीने कधीही तिला नोकरी करण्याची परवानगी दिली.
नव्हती पतीचा जिमचा व्यवसाय होता पण या व्यवसायामध्ये पत्नीने अनेक वेळा पतीला मदत केली होती. अनेक वेळा रिसेप्शनिस्ट म्हणून किंवा इतर अनेक कामे तिने जिममध्ये केली होती याची माहिती तिने न्यायालयाला दिली तेव्हा न्यायालयाने हा वेगळा दृष्टिकोन लक्षात घेऊन पतीने पत्नीला पगार म्हणून 1कोटी 79 लाख रुपये द्यावेत असा आदेश पारित केला.