मुंबई – यंदाची होळी देशभर मोठ्या उत्साहात पार पडली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अगदी रस्त्यावर उतरून होळीचा आनंद घेतला. बॉलिवूडमध्ये देखील होळीचा आनंद पाहायला मिळाला. अनेकांनी रंगाचा आनंद घेत जल्लोषात होळी साजरी केली. अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी होळी पार्टी दिली. होळी पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा मागे कशी राहील. यावेळी शर्लिन होळीच्या एवढ्या आनंदात होती की तिने थेट ढोलावर बसून डान्स केला.
शर्लिन चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये शर्लिनने केलेली होळीची मजा स्पष्टपणे पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये शर्लिन पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घालून होळी खेळताना दिसत आहे. सर्व काही विसरून शर्लिन मस्त स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
शर्लिनचा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रासोबत तिचे अनेक साथीदारही रंगात खेळताना मग्न झालेले दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे रंग खेळताना शर्लिन थेट ढोलावर बसून जोरदार नाचताना दिसली. ढोलावर बसून डान्स करणाऱ्या शर्लिनची ही स्टाइल खूपच खास आहे. ढोलावर नाचताना अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
शर्लिनची ही हटके स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. अनेकांनी तर ही नक्की शर्लिनच आहे का ? असा सवाल विचारला आहे. शर्लिनने आपल्या मित्रांसोबत रंग खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतल्याने तिचे चाहते देखील चांगलेच खुश झाल्याचे पाहायला मिळाले.