‘या’ अनोख्या शुभेच्छा देऊन साजरा करा ‘१५ ऑगस्ट’

१५ ऑगस्ट २०१९, आज भारतात सगळीकडे 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व दैनिक प्रभातच्या वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

हा दिन संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पर्व म्हणून उत्साहात साजरा केले जातो. या दिनानिमित्त काही खास मेसेजद्वारे सर्वाना शुभेच्छा पाठवा.

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भार देश घडविला,
भारत देशाला मानाचा मुजरा


तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा


निशाण फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा


भारतीय राज्यघटना
जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे
सदा राहु दे भान…!
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!


स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा


तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत –जय हिंद, गर्जुदे आसमंत…
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!


रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !


हिन्द देशातील निवासी…
सर्वजण एक आहेत
रंग रुप वेश भाषा
जरी अनेक आहेत…
अशा या भारत देशाचा अभिमान आहे!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा


देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा…
देश विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या रंगीत शुभेच्छा


बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद!!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)