‘काश्मिरी कलीं’चे स्वप्न बघणाऱ्यांना ‘त्या’ नेटकऱ्यांनी दिले सुंदर उदाहरण 

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठीचे विशेषाधिकार रद्द करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयानंतर जल्लोष साजरा केला, तर अनेकांनी या निर्णयाची चिकित्सा करत टीकाही केली. तसेच राजकीय नेत्यांनी काश्मिरी मुलींसोबत विवाह करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. एवढेच नव्हेतर कलम ३७० हटल्यानंतर अनेकांनी गुगलवर काश्मिरी मुलींबद्दल शोधाशोध करत आहेत. नेटकऱ्यांनीही काश्मिरी मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा बोलून दाखविली. अशातच नेटकऱ्यांनी उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

भाऊ-बहिणींचा अतूट नात्याचा म्हणजेच रक्षाबंधन जवळ आला आहे. सर्व जण आपल्या बहिणींना शुभेच्छा देत आहेत. परंतु, एका नेटकऱ्याने काश्मिरी मुलींना बहीण मानले आहे. ठाकूर राघवेंद्र सिंह राजपूत असे त्या नेटकऱ्याचे नाव आहे. त्याने लिहले कि, ज्या मला भाऊ मानतात त्या काश्मिरी बहिणींसाठी माझा हात राखी बांधण्यासाठी सदैव तयार आहे. सर्व बहिणींना माझे प्रेम आणि रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा, असे त्याने ट्विट केले आहे.

 अनेक वर्षानंतर स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकत्र आले आहे. आपल्या सर्वांकडे आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे हीच एक संधी आहे. मुलींबद्दलचे विचार केवळ मोर्चा करून किंवा जनजागृती करून बदलणार नाहीत. त्याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी. अशीच एक सुरुवात नेटकऱ्यांनी करून आपल्या सर्वांसमोर अतिशय सुंदर उदाहरण ठेवले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)