अहमदाबाद – गुजरात विधानसभेच्या कामकाजाचे दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण केले जावे आणि विधीमंडळाच्या सर्व कामकाजाची व कागदपत्रांची माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हावीत अशी मागणी करणारी एक याचिका गुजरात हायकोर्टात दाखल झाली आहे.पण गुजरात विधानसभेच्यावतीने या मागणीला विरोध दर्शवण्यात आला आहे.
माहितीचा अधिकार कायद्यातील काहीं विशिष्ट कलमे आणि घटनेतील काहीं तरतुदींच्या आधारे विधानसभेच्यावतीने या मागणीला हा विरोध दर्शवण्यात आला आहे. या विषयीची जनहित याचिका कोर्टात सादर करण्यात आली आहे.
त्यावर विधानसभेने सरसकट थेट प्रक्षेपणाला विरोध केला आहे. आम्ही विधीमंडळाच्या काही महत्त्वाच्या कामकाजाचे चित्रीकरण गुजराती वाहिन्यांना प्रक्षेपणासाठी देत असतो. तसेच आम्ही विधीमंडळ कामकाजाच्या संबंधातील काही कागदपत्रेही वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतो. त्यात काही प्रमाणात वाढ करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे गुजरात विधीमंडळाच्यावतीने आज कोर्टात सांगण्यात आले.