शिरूर – शिरूर शहर हे रेड झोनमध्ये आहे. शहरातील व्यापारी भागात अत्यावश्यक सेवा व शेतीपूरक उत्पादनांची दुकाने उघडे राहणार असून, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत सर्वांना सेवा मिळणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
शिरूर शहरात केवळ बांधकामांना परवानगी मिळाली असून, याबाबत नियम व अटींचा बांधकाम करणाऱ्या व्यक्ती व ठेकेदार यांनी पालन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेत येणारे मेडिकल, दूध, भाजीपाला, किराणा दुकान हे सायंकाळी सात वाजेपर्यंत तर शेतीपूरक उत्पादन व बी-बियाणे यांचे दुकाने तसेच बांधकाम साहित्यांची दुकाने दुपारपर्यंत उघडी राहणार आहेत.
उपनगरांमध्ये, सोसायटी या ठिकाणी एकच दुकान म्हणजे किराणा दुकान, पिठाची गिरणी, लॉन्ड्रीचे दुकान असेल तर त्यांना परवानगी आहे. दुचाकीवर आता फक्त एकच व्यक्तीला परवानगी असेल. चारचाकीमध्ये चालक व मागे फक्त दोघांना परवानगी आहे.