लोणंदला कांद्याच्या दरात तेजी 

लोणंद –लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी 500 हळवा/ गरवा कांदा पिशवीची आवक झाली. तर कांद्याचे दर 1100 पर्यंत तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.

भुसार बाजारात ज्वारी 2851, बाजरी 2550, गहू 2251, मका 2200,पर्यंत दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला माल चांगला वाळवून व निवडून विक्रीसाठी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.

लोणंद बाजार समितीच्या कांदा बाजारात कांदा नंबर 1 रुपये 900 ते 1100, कांदा नंबर 2 रुपये 700 ते 900, कांदा गोल्टी 400 ते 700 पर्यंत दर निघाले होते. भुसार बाजारात ज्वारी 2500 ते 2851 (आवक 15 पोती), बाजरी 2000 ते 2550 (आवक 20 पोती), गहू 1900 ते 2251 (आवक 25 पोती) पर्यंत दर निघाले होते. जनावरे बाजारात बैल 14000 ते 60000 (आवक 10 नग) गाय 20000 ते 60000 (आवक 25 नग), म्हैस 12000 ते 40000(आवक 10 नग) शेळ्या 3200 ते 13000( आवक 2800 नग), मेंढ्या 3000 ते 12000 (आवक 2900 नग) अशा प्रकारे बाजारभाव लोणंद बाजारात राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.