#video तृणमुलच्या खासदाराचे संसदेच्या आवारात ‘फुटबॉलप्रेम’

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालचे खासदार प्रसून बॅनर्जी यांनी संसदेच्या आवाराच चक्क फुटबॉल खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रिकेट प्रमाणेच फुटबॉलच्या खेळाकडेही सगळ्यांनी लक्ष द्यावे असा त्यांचा उद्देश होता. संसदेच्या आवारात फुटबॉल खेळत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचा सल्लाही दिला आहे. ‘राजकारण कमी, खेळ आणि फुटबॉल जास्त’ असं धोरण ठेवा असेही ते म्हणाले.

भारताने विश्वचषकात खेळणे हा देशासाठी खूप मोठा मान असतो. पण जगात क्रिकेट नाही तर फुटबॉलचे वेड असणारे जास्त चाहते आहेत. त्यामुळे भारताने एक दिवस फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणे हे आपले स्वप्न असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सर्व फुटबॉल प्रेमींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘राजकारण कमी, खेळ आणि फुटबॉल जास्त’ असे धोरण पाहिजे असल्याचे आपण पंतप्रधानांना सांगणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.