महाळुंगे इंगळे -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. बटाटा व लसूण यांची किरकोळ आवक झाली. जळगाव भुईमूग शेंगांची विक्रमी आवक होऊनही शेंगांचे भाव तेजीत राहिले. लसणाची आवक घटून,भाव वधारले.
फळभाज्यांच्या बाजारात फ्लॉवर, वांगी, भेंडी, दोडका व कारल्याची आवक घटूनही त्यांच्या भावात घसरण झाली. दुधी भोपळ्याची आवक घटूनही त्यांचे भाव स्थिर राहिले. पलेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीरीची आवक घटली. तर शेपू व पालक भाजीची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई व बैलांच्या संख्येत वाढ झाली. तर म्हशींची संख्या स्थिर राहिली. तसेच शेळ्यां मेंढ्याच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 7 कोटी, 50 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 18 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 हजार 276 क्विंटलने वाढल्याने भावात 300 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 3 हजार 300 रुपयांवरून 3 हजार रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक 1 हजार 400 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या ही आवक 98 क्विंटलने घटूनही भावात 200 रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव 2 हजार रुपयांवरून 1 हजार 800 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 15 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 4 क्विंटलने वाढूनही भावात 4 हजार 100 रुपयांची उच्चांकी वाढ झाली.
या शेंगांचा कमाल भाव 7 हजार रुपयांवरून 11 हजार 100 रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 5 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने घटल्याने भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली, लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरून 15 हजार रुपयांवर पोहोचला.
फळभाज्या – आवक डागांमध्ये व कंसात प्रतीक्विंटलसाठी भाव
टोमॅटो : 1 हजार 516 पेट्या (500 ते 900), कोबी : 510 पोती (200 ते 400), फ्लॉवर : 485 पोती (300 ते 600), वांगी : 415 पोती (1 ते 2 हजार रुपये), भेंडी : 580 पोती(2, 500 ते 3 हजार 500), दोडका : 290 पोती (1 ते 2 हजार), कारली : 395 डाग (1 हजार 500 ते 2 हजार 500), दुधीभोपळा : 310 पोती (500 ते 1 हजार), काकडी : 516 पोती (400 ते 800), फरशी : 365 पोती (600 ते 1 हजार 200), वालवड : 365 पोती (1 ते 2 हजार), गवार : 215 पोती (3 ते 5 हजार), ढोबळी मिरची : 424 डाग (1 हजार 500 ते 2 हजार 500), चवळी : 198 पोती (2 ते 3 हजार), वाटाणा : 650 पोती (2 ते 3 हजार), शेवगा : 64 पोती (4 ते 6 हजार ), गाजर : 265 पोती (1 ते 2 हजार).