लॉस एंजेलिस – टेस्ला कारचे प्रमुख ऍलन मस्क ट्विटर वर अतिसक्रिय असतात. यामुळे त्यांचा बऱ्याचदा फायदा होतो आणि अनेकदा तोटा होतो. गेल्या आठवड्यात मस्क यांनी ते बिटकॉइन मध्ये दीड अब्ज म्हणजे 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हणाले होते.
त्यानंतर बिटकॉइनबरोबरच टेस्ला कंपनीच्या शेअरच्या भावात भयंकर वाढ झाली. त्यामुळे मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. मात्र नंतर मस्क यांनी लोकांनी जन्मभराची कमाई बिटकॉइन मध्ये टाकू नये असे सांगितले.
या पातळीपर्यंत टेस्लाचे गुंतवणूकदार स्थिर राहिले. मात्र काल बिटकॉइनची किंमत आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचे ट्विट मस्क यांनी केल्यानंतर टेसलाचे गुंतवणूकदार बिथरले. त्यानी टेस्लाच्य ाशेअरची भयंकर विक्री केल्यामुळे टेस्लाचे बाजार मूल्य तब्बल 15 अब्ज डॉलर म्हणजे 1.20 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
परिणामी जगातील सर्वात जास्त श्रीमंत असलेले मस्क आता दोन क्रमांकावर आले आहेत.