kutimb

13,700 कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीला मान्यता

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परीषदेने आज भारतीय सैन्यदल,नौदल आणि वायुदल यांना लागणाऱ्या 13,700 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली आहे. ही सर्व संरक्षण खरेदी स्वदेशी बनावटीनुसार डिझाईन, विकसित आणि उत्पादित केलेल्या उपकरणांच्या खरेदीसाठी आहे.

आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, मुदतीनुसार संरक्षण खरेदी प्रक्रिया तसेच त्वरित निर्णय घेऊन भांडवली अधिग्रहणासाठी वेळेची बचत करून संरक्षण अधिग्रहण परीषदेने या प्रतिनिधींसह आणि प्रतिनिधींशिवायच्या या भांडवली अधिग्रहण कराराला मान्यता दिली आहे, तसेच डी आणि डी शिवाय इतर प्रकरणे दोन वर्षांत निकाली काढली जातील. याव्यतिरिक्त मंत्रालय सेवांबाबत आणि सर्व भागधारकांशी चर्चा करून विस्तृत कृती योजना हाती घेणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.