-->

सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; बहुमत नसताना हिसकावलं महापौरपद

सांगली – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महापौरपदाच्या निवडणुकीत विजय संपादन केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांच्या गळ्यात महापौरपादाची माळ पडली. भाजपाची पाच मते फोडण्यात राष्ट्रवादीला यश आले. तर भाजपाचे दोन नगरसेचक अनुपस्थित राहिले. त्यामुळे आघाडीचा विजय अधिक सुकर झाला.

भारतीय जनाता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वीच सांगलीत येऊन निवडणुकीची व्युहरचना केली होती. त्याचवेळी जयंत पाटील यांनीही आपली शक्ती पणाला लावली. त्यामुळे या निवडणुकीला महत्ब प्राप्त झाले होते.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत 78 जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप41 , अपक्ष 2 , कॉंग्रेस 20 राष्ट्रवादी 15 असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना 36 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांनी विजय मिळवला.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.