पुणे – कोंढवा – कात्रज रस्त्यावरील ब्रीजच्या खाली एकाला अज्ञात वाहनाने जोरदार दिलेल्या धडकेत त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगावन उध्वराज सुर्यवंशी (रा. आंबेगाव पठार) यांचा अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी मुंजा लक्ष्मण सुर्यवंशी (36, रा. फालेनगर, आंबेगाव पठार) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस फौजदार देशमुख करत आहेत.