Pune Crime | फुकट टायर व ट्युब बदलून न दिल्याने कोयत्याने वार; दोघांना अटक

पुणे,दि.8- दुकानदाराने फुकट गाडीचा टायर व ट्युब बदलून न दिल्याने त्याच्यासह दोघांना कोयत्याने व लाकडी दांडक्‍याने मारहाण करण्यात आली. ही घटना रामटेकडी येथील रामनगरमध्ये गुरुवारी घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या तीने ते चार साथीदारांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय मंहेद्र शिंदे अजय महेंद्र शिंदे(दोघे, रा.आदिनाथ सोसायटी, रामटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जावेद अन्सारी (26,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रेहमत कुरेशी यांच्या टायरच्या दुकानात असताना आरोपी अक्षय व अजय तेथे आले. त्यांनी गाडीचा टायर व ट्युब मोफत बदलून देण्यास सांगितले. मात्र फिर्यादी जावेद व रेहमत यांनी त्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन फिर्यादी जावेद व रेहमतला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आली.

ही भांडणेमध्ये सोडवण्यासाठी आलेल्या इरफानला आज तुला खल्लास करतो असे म्हणत जवळील कोयत्याने डोक्‍यात वार केला. यामध्ये इरफान गंभीर जखमी झाला. यानंतर अजयने त्याच्या हातातील लाकडी दांडक्‍याने जावेदवर हल्ला केला. सोबत असलेल्या मुलांनी दगड फेकून मारले, यामध्ये रेहमत यांना दगड लागून ते जखमी झाले. जाताना अक्षयने हातातील कोयता फिरवत आमच्या नादाला लागाल तर एकेकाचे मुडदे पाडू असे म्हणत दहशत माजवली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाडकर करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.