पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
संबंधित रुग्ण पुण्याचे स्थानिक आहे. कुठल्याही परदेशी दौरा त्यांनी केलेला नाही आहे. त्यामुळे स्थानिकांसाठी ही चिंतेची बाब आहे
दरम्यान, संबंधित व्यक्ती यकृताच्या उपचारासाठी ते खासगी रुग्णालयात दाखल झाले असताना त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे.