दोन लहान मुलींवर अत्याचार होवूनही तुम्हाला लाज कशी वाटली नाही?
पोलीसांनी येथून पुढे खोटे गुन्हे दाखल केल्यास चुकीला माफी नाही
आमच्या पुढे दबाव आणि दडपण चालणार नाही – आ.कर्डीले
नेवासा – शिवछञपतींनी स्वराज्य निर्माण केले तेंव्हा सरकार मोगलांचे होते तरीही मावळ्यांनी त्याचा विचार केला नाही,आणि तुम्ही अकरा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाले तरी एकही जण पुढे येवून म्हणाला नाही की,या अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहीजे?,आम्हाला कोणालाच पक्षाचे काही देणे – घेणे नाही, तुम्ही कोणताही झेंडा घ्या,माञ अन्याय होवूनही तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आपला एकच बाप आणि एकच धर्म तो म्हणजे हिंदू असून केवळ अन्याय झाल्यावरच एकञ न येता एेकीची वज्रमुठ कायम ठेवा आणि आपली ताकद दाखवा असे आवाहन प्रखर हिंदूत्ववादी नेते महेशदादा लांडगे यांनी नेवासा येथील जनआक्रोश मोर्चात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले.
शनिवार (दि.२४) रोजी सांयकाळी पाच वाजता झालेल्या नगरपंचायत चौकात हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रसंगी लांडगे बोलत होते यावेळी व्यासपीठावर हिंदू शेरणी साध्वी दुर्गाताई,हिंदूत्ववादी नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव कर्डीले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना लांडगे म्हणाले की,सोनई (ता.नेवासा) येथे अकरा वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला या पिडीत कुटूंबियांची आपण भेट घेतलेली असून गरीब कुटूंबातील वृद्ध आजीला पाठदुखीचा आजार जडला गेल्यामुळे सोनईतील एका प्रार्थनास्थळावर त्यांना घेवून आला तर आजार बरा होईल? असे भासवून सतत दोन लहान मुलींवर अत्याचार करण्याची दुर्देवी घटना सोनईत घडलेली आहे
एवढी मोठी घटना घडवूनही छञपतींचे नांव घेणारा सोनईतील एकही जण पुढे येवून म्हणाला नाही की, अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहीजे,केवळ हिंदू समाज राजकिय स्वार्थासाठी दुभंगला गेलेला असून माऊलीच्या या पुण्यभूमीत अकरा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार होवूनही कोणी तरी काही बोलले का? असा सवालही प्रखर हिंदूत्ववादी नेते लांडगे यांनी उपस्थित करुन आज आम्ही इथे आलो तर उद्या काही जण म्हणतील जातीय सलोखा बिघडविण्यासाठी आम्ही आलेलो आहोत? माञ आम्ही सलोखा बिघडविण्यासाठी नव्हे तर अन्याय झालेला आहे म्हणून आलेलो असून येथून पुढे हिंदू धर्मातील मुलीवर अन्याय झाल्यास कुटूंबितील मुलगी म्हणून पहा आणि पोलीसांनीही माणूस म्हणून विचार करा सोनईत खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याच्या तक्रारीही आमच्याकडे आलेल्या असल्याच्या यावेळी लांडगे यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलतांना यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजीराव कर्डीले म्हणाले की,आतापर्यंत हिंदू हा संयमी होता आता माञ येथून पुढे चुकीचे काम केल्यास कायदा हातात घेवून धडा शिकविण्यात येईल आमच्या पुढे दबाव आणि दडपण चालणार नाही? असा गर्भित इशाराही यावेळी बोलतांना कर्डीले यांनी दिला सोनईत गरीब कुटूंबातील लहान दोन मुलींवर अत्याचार करण्यात आले आरोपींना पोलीसांनी अटकही केलेली असली तरी न्यायालयात या गुन्ह्यातील सत्य परस्थितीची माहीती पोलीसांनी पाठवून आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी पोलीसांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आणि येथून पुढे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केल्यास चुकीला माफ करणार नसल्याचा सज्जड इशाराही यावेळी बोलतांना आ.कर्डीले यांनी दिला.यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.
घाबरु नका तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर …आ.कर्डीले
कोणाच्या दडपणाखाली येवू नका? या व्यासपीठावर आम्ही पुढारी म्हणून आलेलो नाही तर हिंदू म्हणून आलेलो आहोत,आम्हाला पुढारपण महत्वाचे नसून हिंदू धर्म महत्वाचा असल्याचे यावेळी आ.कर्डीले यांनी बोलतांना स्पष्ट करताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.