मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकवाडी येथे दोघांना एकत्र पाहिल्याने त्यांना समजावून सांगितल्याने त्याचा राग येऊन मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवाडी येथील बाबुराव बाळू धुमाळ (वय 25) शेतातून घरी जाताना उल्हास धुमाळ यांच्या घरामागे उल्हास आणि एका महिलेला त्यांनी एकत्रितपणे पाहिले. याबाबत बाबुराव धुमाळ यांनी उल्हास धुमाळ यांना समजावून सांगितल्याचा राग येऊन उल्हास यांनी बाबुराव धुमाळ यांना मारहाण करून धमकी दिली.