काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर देशातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे ज्या देशात एकेकाळी 14 महिला न्यायाधीश कार्यरत होत्या त्याच देशात आज महिलांना घरात बुरखा घालून बसावे लागत आहे देशात पुन्हा एकदा तालिबान्यांची राजवट आल्यानंतर या देशातील महिलांचे काय होईल.
याबाबत संपूर्ण जगाला चिंता वाटत आहे एकेकाळी हा देश महिलांबाबत खूपच सहिष्णू होता 1919 ते 1978 या कालावधीमध्ये महिलांना संपूर्ण स्वातंत्र्य होते 1965 ते 1971 या कालावधीमध्ये 14 अफगाणी महिला न्यायाधीश पदावर कार्यरत होत्या तर दोन महिला सिनेटर म्हणून निवडून आल्या होत्या.
1940 ते 1950 या कालावधीमध्ये अनेक अफगाण महिला नर्स डॉक्टर आणि शिक्षक या पैशांमध्ये कार्यरत होत्या 1960 च्या। दशकात अफगाणिस्तानमधील दहा टक्के महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या होत्या पाश्चिमात्य जगात असलेली फॅशनही त्यांनी अंगीकारली होती 1978 नंतर परिस्थितीच बदलून गेली.
अफगाणिस्तान मधील रशिया आणि अमेरिका यांच्यातील राजकारणामुळे तेथे इस्लामिक विचार प्रबळ होऊ लागला आणि त्याचा फटका नंतर महिला स्वातंत्र्याला बसला कट्टर इस्लामिक वाद्यांनी इस्लामिक कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेऊन महिलांवर अनेक बंधने लादली 89 अफगाणिस्तान मध्ये तालिबान विचार प्रबळ झाला त्यांनी अफगाणिस्तान मध्ये धार्मिक विचार अधिकच प्रबळ केला महिलांवरील अत्याचार वाढू लागले कन्नड मध्ये तालिबान्यांनी प्रथम अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर महिलांवरील बंधने अधिकच तीव्र झाली.
सोबत पुरुष असल्याशिवाय कोणत्याही महिलेला बाहेर पडण्याची परवानगी नव्हती बुरखा घातल्याशिवाय कोणतीही महिला घराबाहेर पडू शकत नव्हती पुरुष डॉकटर कडून वैद्यकीय तपासणी करण्याची ही महिलांना परवानगी नव्हती शिक्षण घेण्यासही प्रतिबंध करण्यात आला होता तालिबान्यांची राजवट गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकशाही सरकार प्रस्थापित झाल्यावर अफगाणिस्तानमधील परिस्थिती थोड्याफार प्रमाणात बदलली होती.
पण अमेरिकेने तेथील सैन्य माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तान वर्चस्व प्रस्थापित केल्याने अफगाणिस्तानमधील महिला पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत अफगाणिस्तान मधील विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांवरही आता संकट आले असून त्यांच्यावरील हल्लेही वाढत चालले आहेत.
तालिबानी राजवटीने महिलांना योग्य सन्मान दिला जाईल अशी घोषणा केली असली तरी तालिबान्यांनी शरीयत कायदा लागू करण्याची घोषणा केल्याने अफगाणिस्तानमधील महिलांबाबत जगाला चिंता वाटू लागली आहे