केसनंद येथे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस चौकी सुरू

वाघोली – लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या केसनंद भागातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने केसनंद येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली असून या चौकीचे उद्घाटन पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण वरात, केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन गावडे,
माजी सरपंच मिलिंद हरगुडे, उपसरपंच रूपाली हरगुडे, राजेंद्र सावंत,तानाजी हरगुडे,प्रकाश जाधव, तानाजी बांगर,शंकर वाबळे,वाल्मीक हरगुडे,रहीम शेख, अलका सोनवणे,
प्रमोद हरगुडे, दत्ता हरगुडे, अक्षदा हरगुडे, सुजाता गायकवाड,सचिन हरगुडे, सुनिता हरगुडे, सुनिता झांबरे,विशाल हरगुडे, धनंजय हरगुडे,गणेश राणे, बाजीराव साळूंके, शिवाजी पाटोळे, पंडित वाबळे, रेखा बांगर, आदी मान्यवर उपस्थित होते.





