नवी दिल्ली : देशात सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 71% आहे. 13 ते 19 जानेवारी दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. PM मोदींनी लोकप्रियतेच्या आलेखात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहाव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान 13व्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
* जगातील टॉप १० नेत्यांची नावे
* नरेंद्र मोदी-पंतप्रधान (भारत) – 71 टक्के
* लोपेझ ओब्राडोर -राष्ट्राध्यक्ष (मेक्सिको) – 66 टक्के
* मारिया द्राघी – पंतप्रधान (इटली) – 60 टक्के
* फुमियो किशिदा- पंतप्रधान (जपान)- 48 टक्के
* ओलाफ स्कोल्झ चांसलर – (जर्मन) – 44 टक्के
* जो बिडेन-अध्यक्ष (अमेरिका) – 43 टक्के
* जस्टिन ट्रूडो -पंतप्रधान (कॅनडा) – 43 टक्के
* स्कॉट मॉरिसन-पंतप्रधान (ऑस्ट्रेलिया) – 41 टक्के
* पेड्रो सांचेझ- अध्यक्ष (स्पेन) – 40 टक्के
* मून जे-ए – राष्ट्राध्यक्ष (कोरिया)- 40 टक्के