मुंबई – आजच्या जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली काही निवडक अर्कचित्रं ट्विटरद्वारे शेअर केली आहेत. हि अर्कचित्र शेअर करताना राज ठाकरे यांनी, “आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. आज माझ्या संग्रहात डोकावलं तेंव्हा माझी जुनी ‘अर्कचित्रं सापडली. ही अर्कचित्रं इथे टाकत आहे. जरूर बघा.” असा संदेशही दिला आहे.