महिला दिनानिमित्त स्वाती ठाकुर एक दिवसासाठी पोलीस निरीक्षकपदी विराजमान

येरवडा : येरवडा पोलीस ठाण्यात 15 दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून बदली होऊन आलेल्या स्वाती रघुसिंह ठाकुर या एक दिवसासाठी पोलीस निरीक्षक पदावर विराजमान झाल्या. जागतिक महिला दिनानिमित्त येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवुन महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

महिला दिनी संपूर्ण दिवस येरवडा पोलीस स्टेशनचे कामकाज पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकुर यांनी पाहिला. यावेळी स्टेशनला आलेल्या तक्रारी त्याचे निवारण करणे. वरिष्ठांसोबत बैठक, महिला दिनानिमित्त कार्यक्रमांना उपस्थिती, कायदा सुव्यवस्था राहावी. यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणुक तसेच पेट्रोलिंग त्याचा आढावाही स्वाती ठाकुर यांनी घेतला. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख व गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांनी सहकार्य केले.

स्वाती ठाकूर म्हणाल्या कि, सकाळी साहेबांचा फोन आला. आज पोलीस स्टेशनचे इनचार्ज तुम्ही आहात तेव्हा आनंद झाला मात्र त्याचवेळी जबाबदारीची जाणीवही झाली. सकाळी पोलीस स्टेशनला येऊन कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन रिपोर्टिंग केला. लॉकअपची पाहणी केली. त्यात असणाऱ्या आरोपींची तपासणी केली.पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारी ऐकून त्याचे निवारण केले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग केले.पोलीस दलात एवढया कमी कालावधीत एवधी मोठी संधी दिल्याबद्दल स्वाती ठाकुर यांनी पोलीस निरीक्षक युनुस शेख यांचे आभार मानले.

स्वाती ठाकुर यांनी यापूर्वी जिल्हा परीषदेत एक वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. 2018-19 या वर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नाशिकला ट्रेनिंग होऊन पहिली पोस्टिंग 2020ला विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे झाली. एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनला बदली होऊन 15 दिवस झाले आणि वरिष्ठांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविल्याचा आनंद वाटत आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने येरवडा पोलीस स्टेशनचा कारभार एक दिवस सांभाळण्याची जबाबदारी
नवनियुक्त महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.