पुण्यतिथीनिमित्त सरदार पटेल यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली – सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, सरदार पटेल म्हणजे बलवान आणि समृद्ध भारताचा पाया रचणारे लोहपुरूष होते.

सरदार पटेलांनी दाखविलेला मार्ग आपल्याला देशातील ऐक्‍य, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव प्रेरणा देईल, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वातंत्र्यसैनिक, भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान बनलेले पटेल यांना भारतातील राज्ये एकत्रित करण्याचे श्रेय जाते. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या संभाषण कलेद्वारे आणि गरज निर्माण झाली तिथे ताकदीच्या वापर करून त्यांनी सर्व राज्ये भारतात एकत्रित केली.

पंतप्रधानांनी त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्‍त केला. पटेल यांना श्रद्धांजली म्हणून गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारला असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.