पुणे – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची अकादमी आता पुण्यनगरतही दाखल होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध क्रिकेट मास्टर्स अकादमीसह धोनीच्या अकादमीला येथे सुरूवात होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता त्याच्या अकादमीच्या माध्यमातून तो देशाची नवी क्रिकेट पिढीही घडवणार आहे.
त्याच्या अकादमीच्या शाखा देशात विविध ठिकाणी सुरु होत आहेत. त्यातच महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ पुण्यातही ही अकादमी दाखल होत आहे. या अकादमीच्या संचालकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटी क्रिकेटपटू डॅरील कुलीनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या अकादमीच्या वाटचालीबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी एका परिषदेत माजी रणजीपटू बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अकादमीचे अण्णा थोरात, गजेंद्र पवार तसेच अनिल वाल्हेकर उपस्थित राहणार आहेत.