खडकवासला- प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी डागडुजीच्या कामाकरिता एकूण ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होता. त्यापैकी जुन्या इमारतीसाठी १९ लाख रुपये निधी उपलब्ध होता. ज्यामध्ये पत्रे बदलणे व फ्लोरिंग फरशी बदलणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जुन्या इमारतींचा मटेरियल निघाला होता. यामध्ये साधारणत अंदाजे दीडशे लोखंडी पत्रे होते व जुन्या पद्धतीच्या तुळया मोठ्या प्रमाणावर ती लाकडे होती. हा जो काही मटेरियल आहे.
हा ठेकेदाराकडें एक तर काम पुर्ण होऊन हस्तांतरण होत नाही तोपर्यंत कस्टडी मध्ये असायला हवा होता. परंतु तो अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने विक्री केलेला आहे .ज्या कामाच्या ठिकाणी हा मटरेल असायला हवा होता .तो आता या ठिकाणी आढळत नाही या विषयावर ती माहिती अभियंत्यांना विचारले त्यावेळी हा जो काही मटेरियल निघाला आहे. तो ठेकेदाराकडून आम्ही रिकव्हरी करू असं ते सांगत आहेत. परंतु स्थानिक गावकर्यांची अशी माहिती आहे.
की हा मटेरियल आहे तो परस्पर ठेकेदार व अभियंत्यांनी संगनमताने करून विक्री करून यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. शासनाची अनुमती न घेता हा केलेला भ्रष्टाचार असून त्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी .अशी स्थानिकांची मागणी आहे जेणेकरून अशा पद्धतीने शासकीय कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार यापुढे करताना कोणाची हिंमत होणार नाही हाच यामागचा उद्देश आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला इमारत डागडुजी कामातील निघालेला जुना मटेरियल ज्यामध्ये दिडशे पत्रे व मोठ्या प्रमाणावर असणारे लाकडी तुळया हे ठेकेदाराकडून व जिल्हा परिषद अभियंता यांच्याकडून परस्पर संगनमताने विक्री करून भ्रष्टाचार केलेला असून यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा पद्धतीने भ्रष्टाचार करण्यास कोणीही धजावणार नाही.
– विजय मते अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ मनसे
संबंधित निविदा व झालेल्या कामात तफावत आढळते कोंटीग पत्रा , फरशीचा दर्जा हे ठेकेदाराकडून हलक्या प्रतीचे वापरलेले असून याठिकाणी जुन्या इमारतींचा निघालेला मटेरियल सुद्धा आढळून येत नाही तरी याविषयी कारवाई करुन जुन्या मटेरियल ची रिकव्हरी आवश्यक आहे .
– मोहन मते सिव्हिल इंजिनिअर
जुन्या इमारतींचा मटेरियल आमच्या समोर ठेकेदाराकडून नेण्यात आला असून तो कुठे नेला व याविषयी शासकीय परवानगी देण्यात आली का याची माहिती आम्हाला नाही
– वंदना गवळी आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला