मुंबई – ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला याड लावले होते. यातील गाणी, डायलॉग, लोकेशनसह सर्वकाही हिट ठरले होते. अशातच चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी आर्ची आणि परश्या ही जोडी चागंलीच हिट ठरली. अभिनेता आकाश ठोसरने परश्याची, तर रिंकू राजगुरूने आर्चीची भूमिका निभावली होती. या चित्रपटातून एका रात्रीत दोघेही लोकप्रिय झाले होते. यानंतर पुढील प्रवासाकरीता दोघांनी आप-आपली वाट धरली.
दरम्यान, आता बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर आकाशाची चर्चा होऊ लागली आहे. आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो, इंस्टाग्रामवर सुद्धा त्याचे असंख्य फॉलोवर्स आहेत. नुकतंच अभिनेता आकाश ठोसरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो रावडी लूकमध्ये दिसून येत आहे.
आकाशने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत असून त्याने हटके हेअर स्टाइल केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचे काही नवनवीन स्टाइलचे फोटो तो शेअर करत आहे. सध्या आकाशचा रावडी लूक नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. त्याचे फॅन्स सुद्धा या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.