पुणे : संत तुकाराम महाराजांसोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केले. तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहण्याचे काम करून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ‘संत संताजी महाराज जगनाडे’ यांच्या नावाने ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्यान’ ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचेच भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी संत संताजी महाराज जगनाडे यांचे कार्य लोकांपुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल, असे मत उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लवज चौक जवळील उड्डाण पूलाच्या खाली मोकळ्या जागेत अर्थात प्रभाग क्र .19 मध्ये तसेच पालिकेच्यावतीने अविनाश रमेश बागवे, नगरसेवक यांच्या निधीतून हे उद्यान विकसित होणार आहे. या उद्यानाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते . यावेळी माजी गृह राज्य मंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे रमेश बागवे, नगरसेवक आबा बागुल, नगरसेवक विशाल धनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
रमेश बागवे म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठया प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक ज्यांनहीं यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे अभिनंदन .
या प्रसंगी शिवदास उबाळे , घनश्याम वाळुंजकर ,शिवराज शेलार, विजय रत्नपारखी , ऍड. राजेश येवले, नामांकित आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे , दत्तात्रय शेलार, संजय जगनाडे, जनार्दन जगनाडे, ऍड. आनंद धोत्रे, प्रदीप उबाळे इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांच्याकडे विजयकुमार शिंदे तिळवण तेली समाजाचे उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान व माजी अध्यक्ष यांनी प्रस्ताव सादर केला. यामध्ये ऍड. राजेश येवले यांचे सहकार्य लाभले.