नागठाणे – काशीळ येथे एका वृद्धाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. नवनाथ भैरू ठेंगे (वय 70 रा. काशीळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ ठेंगे यांना दारूचे व्यसन होते.
त्यांच्या पत्नी दि. चार रोजी नातेवाईकांच्या वास्तूशांतीसाठी परगावी गेल्या होत्या. दि. 6 रोजी सचिन ठेंगे यांनी मृताच्या मुलास तुझे वडील दरवाजा उघडत नाहीत असे कळविले. त्यावरून मुलगा नामदेव यांनी दरवाजा तोडून आत जावुन पाहिले असता नवनाथ ठेंगे यांनी घराच्या तुळईला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसुन आले. मुलगा नामदेव ठेंगे याने बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बाबा महाडीक तपास करत आहेत.