वॉशिंग्टन – अमेरिकेची फार्मा कंपनी मॉडर्नाने करोना महामारी रोखण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रति लसीची किंमत 25 ते 37 डॉलर्स दरम्यान असेल.
या कंपनीचे सीईओ स्टीफन बॅन्सेल यांनी जर्मनच्या वेल्ट एम सोनमग या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, करोना लस अंतिम टप्प्यात आहे. बॅन्सेल यांच्यानुसार महामारीमुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता या लसीची किंमत योग्य ठेवण्यात आली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, लसीच्या प्रमाणानुसार लसीची किंमत वेगवेगळी असेल. या वर्षाअखेर कंपनी 2 कोटी करोना व्हक्सिन तयार करण्याची शक्यता आहे. यूरोपला ही लस कमी प्रमाण मध्ये उपलब्ध करण्यात येईल.
पुढे ते म्हणाले, या लसीचा तिसरा टप्पा 94.5 टक्के यशस्वी झाला आहे. त्यामुळे करोनावर ही लस प्रभावी ठरणार आहे.