fbpx

जानेवारीत येणार करोनाची तिसरी लाट; WHO चा ‘या’ देशाला इशारा

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना सरकारने केल्या नाहीत तर युरोपात करोनाची तिसरी लाट 2021 च्या सुरवातीला येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष करोना दुताने दिला आहे.

पहिली लाट ओसरल्यानंतर उन्हाळ्यातील महिन्यात आवश्‍यक पायाभूत सुविधा उभारण्यात ते कमी पडले, असे संघटनेचे करोना दूत डेव्हीड नॅबरो यांनी सांगितले. ते एका स्वीस दैनिकाशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या आपण करोनाची दुसरी लाट अनुभवत आहोत. जर त्यांनी आवश्‍यक पायाभूत सुविधा उभारल्या नाहीत तर पुढील वर्षाच्या सुरवातीला तिसरी लाट येऊ शकते.

युरोपमध्ये सध्या बाधितांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. जर्मनी फ्रान्समध्ये शनिवारी 33 हजार बाधित सापडले. तर स्वीत्झर्लंड आणि ऑस्ट्रियात हजारो केसेस रोज आढळत आहेत. तुर्कस्तानात एका दिवसात पाच हजार 532 बाधितांची नोंद झाली.

नॅबरो म्हणाले, स्वीत्झर्लंडमध्ये स्काईंगला परवानगी देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्या देशांत बाधितांची आणि मृत्यूची संख्या मोठी असू शकते. एकदा बाधितांची संख्या कमी व्हायला लागली की ती कमी होत जाईल. त्यानंतर आपण हवे ते करण्यास मोकळे आहोत. पण सध्या स्थिती काय आहे? कोणत्या स्थितीत स्काईंग रेसॉर्ट खुली केली आहेत?

आशियाई राष्ट्रांनी मुदतपुर्व बंधने उठवली नाहीत. तुम्ही बाधित संख्या कमी होईपर्यंत थांबले पाहिजे. युरोपचा प्रतिसाद अपुरा होता, असेही नॅबरो म्हणाले.

द. कोरीयाचे सुरक्षित वर्तन
दक्षिण कोरीयात तुम्ही पाहिलेत तर बाधित संख्या मर्यादित आहे. तेथे सर्व कामे सुरू आहेत. मात्र, त्या नागरिकांचे वर्तन सुरक्षित असल्याने तेथे विषाणूला प्रसार करणे शक्‍य होत नाही. ते सामाजिक अंतर पाळतात, मास्कचा वापर करतात. त्यांना आजारपण येते त्या वेळी ते स्वत:ला विलगीकरणात ठेवतात. हात आणि पृष्ठभाग वारंवार धुतात. त्यामुळे ते देशातील मोठ्या समुहाला सुरक्षित ठेवू शकतात, याकडे नॅबरो यांनी लक्ष वेधले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.