वेलिंग्टन : कर्णधार केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने कसोटी क्रिकेट मालिकेतील सामन्यात पहिल्या डावात सर्वबाद ३४८ धावा केल्या असून भारतीय संघावर १८३ धावांची आघाडी घेतली आहे.
That is it! New Zealand's innings folds for 348 and they take a lead of 183 runs. @ImIshant picks up his 11th five-wicket haul and is now 3 short of completing 300 dismissals in Test cricket #TeamIndia #NZvIND
Details – https://t.co/lrVl5hObDT pic.twitter.com/PEhzQq8TCe
— BCCI (@BCCI) February 23, 2020
प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुस-या डावात फलंदाजी करताना तिस-या दिवसअखेर ६५ षटकात ४ बाद १४४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ३९ धावांनी पिछाडीवर असून तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अंजिक्य रहाणे २५(६७) तर हनुमा विहारी १५(७०) धावांवर खेळत होते.
That will be the end of Day 3 here in Wellington 👍
Rahane & Vihari fighting hard after Mayank Agarwal's half century. Join us for Day 4 tomorrow #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/jocMvIzEyk
— BCCI (@BCCI) February 23, 2020
संक्षिप्त धावफलक : भारत : पहिला डाव : ६८.१ षटकांत सर्वबाद १६५( मयंक अग्रवाल ३४, अंजिक्य रहाणे ४६, मोहम्मद शमी २१, रिषभ पंत १९, विराट कोहली २, टिम साउदी ४-४९, काइल जेमीसन ४-३९) आणि दुसरा डाव : ६५ षटकात ४ बाद १४४( पृथ्वी शाॅ १४, मयंक अग्रवाल ५८, चेतेश्वर पूजारा ११, विराट कोहली १९, अंजिक्य रहाणे खेळत आहे २५, हनुमा विहारी खेळत आहे १५, ट्रेंट बोल्ट ३-२७, टिम साउदी १-४१) विरूध्द न्यूझीलंड : पहिला डाव : १००.२ षटकात सर्वबाद ३४८( केन विल्यमसन ८९, राॅस टेलर ४४, काॅलिन डी ग्रैडहोम ४३, काइल जेमीसन ४४, ट्रेंट बोल्ट ३८, टाॅम ब्लंडेल ३०, इशांत शर्मा ५-६८, रविचंद्रन अश्विन ३-९९, मोहम्मद शमी १-९१, जसप्रीत बुमराह १-८८).