हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंविरूध्दच्या मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात शनिवारी पहिल्या डावात सर्वबाद ३७५ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात दुस-या दिवसअखेर इंग्लंच्या १८ षटकांत २ बाद ३९ धावा झाल्या असून ते अजूनही ३३६ धावांनी पिछाडीवर आहेत.
Stumps in Hamilton!
England lose Dom Sibley and Joe Denly to end the second day on 39/2. They trail by 336 runs.#NZvENG SCORECARD 👇https://t.co/eBrKe7xmfM pic.twitter.com/M7AJlGRC8W
— ICC (@ICC) November 30, 2019
इंग्लंडची पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या ११ असताना त्यांना डोमिनिक सिबलीच्या रूपात पहिला धक्का बसला. टिम साउदीने सिबलीला ४ धावांवर एल बी डब्ल्यू बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेला जो डेनलीसुध्दा अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. त्याला मॅट हेनरीने वाॅलिंगकरवी झेलबाद केल. त्यानंतर दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या २ बाद ३९ धावा झाल्या असून राॅरी बर्न्स नाबाद २४ आणि जो रूट नाबाद ०६ धावांवर खेळत होता.
तत्पूर्वी, कालच्या ३ बाद १७३ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव ३७५ वर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात टाॅम लॅथमने सर्वाधिक १०५ धावांची तरी डैरेल मिचेल ७३, बी जे वाॅटलिंग ५५ आणि राॅस टेलरने ५३ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून स्टअर्ट ब्राॅडने सर्वाधिक ४ गडी बाद केले. क्रिस वोक्सने ३, सॅम करनने २ आणि जोफ्रा आर्चरने १ गडी बाद केला.