कोलिफोर्निया/ म्हैसूर : कॅलिफोर्निया विद्यापीठात कंम्प्युटर सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. मुळचा म्हैसुर येथील असणाऱ्या अभिषेक भट (वय25) असे त्याचे नाव आहे.
आपल्या रिकाम्या वेळेत अभिषेक सॅन बर्नांडिनो येथील एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम काम करत असे. या हॉटेलमधून तो घरी परतत असताना त्याची हत्या करण्यात आली. ही घटना समजताच म्हैसूर येथे वास्तव्य करणारे त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.
दरम्यान, अभिषेकची हत्या 28 तारखेला झाली. त्याला दोन दिवस उलटूनही त्याचा मृतदेह अद्याप भारतात परत आणला नाही. तो परत आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा लढा सुरू आहे. अभिषेकच्या अमेरिकेत राहणाऱ्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईट हवामानामुळे सॅन बर्नांडिनोकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मृतदेह परत आणण्यास उशीर होत असल्याचे सांगितले.
अभिषेकच्या कुटुंबियांनी याबाबत मदत करण्यासाठी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या प्रकरणात मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे.
अभिषेकने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांना एक मेसेज पाठवला होता. मात्र त्या मेसेजबाबत त्याच्या कुटुंबियांनी पारशी वाच्यता केली नाही. मात्र थोड्या वेळाने त्यांनी व्यवस्थित असल्याचा तो मेसेज होता, असे सांगितले.
या मेसेजनंतर थोड्याच वेळात त्याच्या मित्र श्रीवत्स याचा मेसेज आला. कृपया ताबडतोब फोन करा असा संदेश त्यात होता. त्यानुसार कुटुंबियांनी फोन केला असता त्याने अभिषेकची गोळ्या मारून हत्या केल्याचे सांगितले.
अभिषेकचे वडील सुरेश चंद हे योग प्रशिक्षक आहेत. तर अभिषेकने म्हैसुरू येथील विद्याविकास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग आणि टेक्नॉलॉजी या संस्थेतून 2016 मध्ये पदवी घेतली. सुमारे दीड वर्षापुर्वी तो अमेरिकेत पदव्यत्तर शिक्षणासाठी गेला.