बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी बिग बजेट असलेल्या “राम सेतु’चे शुटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाचा शुभारंभ नुकताच अयोध्या येथे पहिला शॉट शूट करण्यात आला आहे. यात अक्षय कुमारसह अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
नुसरत भरूचाने इंस्टा स्टोरीवर एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये ती चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. नुसरतने “राम सेतु’मधील आपले को-स्टार अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांना टॅग करत लिहिले की, “चला, करून दाखवूया!’
View this post on Instagram
ही क्लिप सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. यात नुसरत चित्रपटाची पूर्वतयारी करत असल्याचे दिसत आहे. यावर असंख्य कमेंट्स येत असून अनेकांनी त्याला लाइक्स दर्शविले आहेत.
View this post on Instagram
“राम सेतु’मध्ये अक्षय कुमारसोबत नुसरत भरूचा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहे. यामुळे या प्रोजेक्टसाठी ती खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत अद्याप सस्पेंस ठेवण्यात आला आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नुसरत “राम सेतु’शिवाय विशाल फुरियाच्या “चोरी’, ओमंग कुमारच्या “जनहित में जारी’, “हुडदंग’ आणि “अजीब दास्तांस’मध्ये झळकणार आहे.
View this post on Instagram