नन बलात्कार प्रकरण ; बिशप फ्रॅंको मुलक्कल यांच्यावर दोषारोप पत्र दाखल

केरळ – ननवरील बलात्कार प्रकरणात केरळ पोलिसांनी आज बिशप फ्रॅंको मुलक्कल यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मागच्या काही दिवसांपासून मुलक्कल यांची कसून चौकशी सुरु होती. ननवरील बलात्कार प्रकरणात अटक झालेले फ्रॅंको मुलक्कल भारतातील पहिले बिशप आहेत.

केरळ पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाने आरोपी फ्रॅंको मुलक्कल यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये   ३४२ – बेकायदेशीर बंधन, ३७६ (सी) (अ) – ताकदीचा गैरवापर आणि लैंगिक अत्याचार, ३७७ – अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, ५०६ (१) – घाबरवणे आणि धमकी देणे या कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

बिशप फ्रॅंको मुलक्कल यांची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी बिशम फ्रॅंको मुलक्कल यांनी व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.